भजनी मालिका
← भजनांकडे परत

गार्‍हाणें सांगाया । आल्या गोकुळींच्या स्रिया

gar‍hanen sangaya | alya gokulinchya sriya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गार्‍हाणें सांगाया । आल्या गोकुळींच्या स्रिया ॥१॥ यशोदा ऐकत । पळे बाहेरी भगवंत ॥२॥ एक ह्मणे लोणी । माझें भक्षी चक्रपाणी ॥३॥ फोडितसे भांडे । विर्जिलिया ह्मणे रांडे ॥४॥ गाई वासरें सोडितो । येऊन आह्मांसी सांगतो ॥५॥ अष्टदळ का-ढिलें अंगणीं । वरी मुते चक्रपाणी ॥६॥ घेऊनियां आला अग्न । तुझ्या घरासी लावीन ॥७॥ देईन मी तोंडावर । तुझ्या बापाचें हे घर ॥८॥ घेतसे वरखडे । शिण्या देऊनियां रडे ॥९॥ एकी ह्मणे गरोदर । पाहूं तुह्मा गे डोंगर ॥१०॥ सांगती गौळणी । यशोदा तें ऐके कानीं ॥११॥ नामा ह्मणे न मनी देव । माय ह्मणे अवघी वाव ॥१२॥