भजनी मालिका
← भजनांकडे परत

गहिनीनाथें मज सांगितलें सार । केली ज्ञानेश्वरें व्याख्या त्याची

gahininathen maj sangitalen sar | keli dnyaneshvaren vyakhya tyachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गहिनीनाथें मज सांगितलें सार । केली ज्ञानेश्वरें व्याख्या त्याची ॥१॥ काढिला शोधून अनुभव मुक्ताईनें । ते ज्ञान सोपानें संपादिलें ॥२॥ अनुभवें निवविला चांगा वटेश्वर । विसोबा खेंचर सिद्ध जाला ॥३॥ त्या ज्ञानें जाला चांगदेव विकळ । त्यागियेली सकळ अविद्या माया ॥४॥ अज्ञानासी ज्ञान जालें तैं सहज । ऐसें निवृत्तिराज आठविती ॥५॥ सप्तश्रृंगीं आले देव सुरगण । उतरिलीं विमानें नामा म्हणे ॥६॥