भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडियांसी तेव्हां सांगितलें देवें । स्त्रियांसी सांगावें जाऊनियां

gadiyansi tevhan sangitalen deven | striyansi sangaven jauniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गडियांसी तेव्हां सांगितलें देवें । स्त्रियांसी सांगावें जाऊनियां ॥१॥ नको कृष्णा द्वीज आम्हांसी मारिती । अभय श्रीपती त्यांसी देत ॥२॥ त्वरें करोनियां गेले स्त्रियांपाशीं । सांगितलें त्यांसी वर्तमान ॥३॥ ऐकोनियां ऐसेम उठिल्या सत्वर । वर्जिती भ्रतार तेव्हां त्यांचे ॥४॥ एका ब्राह्मणानें स्त्रियेसी बांधिलें । प्राणासी सोडिलें परीक्षिती ॥५॥ सकुमार सांवळा राजीवलोचन । पहा-ताती कृष्णमुख तेव्हाम ॥६॥ आनंदानें नेत्रीं वाहातें जीवन । पुसे वर्तमान नामा ह्मणे ॥७॥