भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकी एकादशी करितां काय वेंचे । उपवासी राहतां काय वेंचे

eki ekadashi karitan kay venche | upavasi rahatan kay venche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकी एकादशी करितां काय वेंचे । उपवासी राहतां काय वेंचे ॥१॥ एक तुळसीदळ वाहतां काय वेंचे । पाउलीं वंदितां काय वेंचे ॥२॥ तुज जागरणा जाणां काय वेंचे । हरिहरि ह्मणती काय वेंचे ॥३॥ संतसमागमा जातां काय वेचें । चरणरज वंदितां काय वेंचे ॥४॥ एक दंडवत करितां काय वेंचे । अपराधी ह्मण-वितां काय वेंचे ॥५॥ एक प्रदक्षिणा करितां काय वेंचे । तीर्थया- येसी जातां काय वेंचे ॥६॥ ऐसी निमाली भक्ति कां न करिसी निर्दैवा । नामा ह्मणे केशवा अनुसर पां ॥७॥