भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी । ह्मणे वाचा उदंडीं रामनाम

eke hatin tal eke hatin dindi | hmane vacha udandin ramanam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एके हातीं टाळ एके हातीं दिंडी । ह्मणे वाचा उदंडीं रामनाम ॥१॥ श्रीहरीसारिखा गोसांवी पैं चांगु । फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा ॥२॥ ऐसें नृत्य करी वेडें बागडें । वदन वांकुडें करू-नियां ॥३॥ चुकलें पाडस कुरंगिणी गिवसिती । तैसा ह्लषिकेशी न्या-हाळी तुतें ॥४॥ धेनु पान्हाय हुंबरे वत्सातें । तैसा वोरस तूं तें केशिराज ॥५॥ नाभा ह्मणे इतुकें न करवे निर्दैवा । तरी वाचेसि केशवा उच्चारी पां ॥६॥