भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके दिवशीं न्हावयास । पाणी नव्हतें विसणास

eke divashin nhavayas | pani navhaten visanas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एके दिवशीं न्हावयास । पाणी नव्हतें विसणास ॥१॥ देव धांवोनियां आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥ आपुल्या हातें विसणीं । घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥ माझ्या डोईच्या केसांस । न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥ तेणें मुरडी केसांस । कां म्हणे उगीच बैस ॥५॥ आपुल्या हातें वेणी घाली । जनी म्हणे माय झाली ॥६॥