भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके दिनीं रत्नसिंहासनावरी । कैसा त्रिपुरारी शोभ-तसे

eke dinin ratnasinhasanavari | kaisa tripurari shobh-tase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एके दिनीं रत्नसिंहासनावरी । कैसा त्रिपुरारी शोभ-तसे ॥१॥ सांगों जातां चार्‍ही वाचा विसांवती । तेथें माझी मति काय सांगों ॥२॥ वामभागीं साजे सुंदरी भवानी । सिद्ध ऋषि मुनि करिती सेवा ॥३॥ नारद तुंबर गर्जती गायन । तेथें कर जोडोन उभे देव ॥४॥ गणेश शण्मुख ढाळिती चामरें । रिद्धिसिद्धि द्वार राखिताती ॥५॥ नामा चा गजर मृदंगाची घाई । पाहाती नवाई ब्रह्मादिक ॥६॥ नामा म्हणे करीं देतसे विडिया । लागोनियां पायां वारंवार ॥७॥