भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकवेळ नयनीं पहावा । मग जाईजे भलत्या गांवा

ekavel nayanin pahava | mag jaije bhalatya ganva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकवेळ नयनीं पहावा । मग जाईजे भलत्या गांवा ॥१॥ आठवाल वेळोवेळां । विठोबा आहेरे जवळां ॥२॥ ह्लदयीं मांडू-नियां ठसा । नामा म्हणे केशव असा ॥३॥