भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकांत एकला सर्व आहे हरी । ऐसेंचि अहर्निशीं ध्यायिजे तूं

ekant ekala sarva ahe hari | aisenchi aharnishin dhyayije tun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकांत एकला सर्व आहे हरी । ऐसेंचि अहर्निशीं ध्यायिजे तूं ॥१॥ सर्वांभूतीं विठठल आहे आहे साचे । हें तंव वेदींचे वचन जाण ॥२॥ मार्ग हाचि सोपा गेले मुनिजन । जनीं जनार्दन हाचि भावो ॥३॥ नामा म्हणे नाम मंत्र उच्चारण । सर्वही कारण होईल तुझें ॥४॥