भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकमेळीं जेविती वैष्णव सकळ । वाढिती गोपाळ सकळांसी

ekamelin jeviti vaishnav sakal | vadhiti gopal sakalansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकमेळीं जेविती वैष्णव सकळ । वाढिती गोपाळ सकळांसी ॥१॥ पांडुरंगें केला चांगोबाचा सोहळा । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥ गंध आणि अक्षता विसोबाचे हातीं । महापूजा होती चांगोबाला ॥३॥ आरत्या पंचारत्या करिती आनंदानें । नामा म्हणे प्रेमें वोसंडलें ॥४॥