भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकचि क्षरलें एकचि देखिलें । ब्रह्म हें संचलें हरिनामें

ekachi ksharalen ekachi dekhilen | brahma hen sanchalen harinamen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकचि क्षरलें एकचि देखिलें । ब्रह्म हें संचलें हरिनामें ॥१॥ एक एकाकार सर्वही आकार । राम हा साकार सर्वांघटीं ॥२॥ असोनी निराळा सुमनाचा वास । तैसा ह्रषिकेश जीवां सकळां ॥३॥ नामा म्हणे सुमन कळिकाळें एक । तेंचि निजसुख घेई जना ॥४॥