भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकचि हें तत्व एकाकार देशीं । एक तो ने-मेसी सर्व जनीं

ekachi hen tatva ekakar deshin | ek to ne-mesi sarva janin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकचि हें तत्व एकाकार देशीं । एक तो ने-मेसी सर्व जनीं ॥१॥ ऐसें ब्रह्म पाहा आहे सर्व एक । न-लगे तो विवेक करणें कांहीं ॥२॥ मिथ्या हें डंबर माया मथितार्थ । हरि हाचि स्वार्थ वेगीं करीं ॥३॥ नामा ह्मने समर्थ बोलिला तो वेद । नाहीं भेदाभेद ब्रह्मपणीं ॥४॥