भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक गोप तेव्हां स्रियेसी सांगत । सांठवीं समस्त नवनीत

ek gop tevhan sriyesi sangat | santhavin samasta navanit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक गोप तेव्हां स्रियेसी सांगत । सांठवीं समस्त नवनीत ॥१॥ देवाचा नवस आहे पुरवणें । धरावें येथून अनसुट ॥२॥ सांगोनियां ऐसें राहिला तो स्वस्थ । मागें स्त्रीनें कृत्य काय केलें ॥३॥ चोरोनियां घृत भरोनि घागरीं । नेवोनि शेजारी ठेवि-येल्या ॥४॥ गौळियानें तेव्हां संकल्प सोडिला । नवस फोडिला नामा ह्मणे ॥५॥