भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक गोक्षीर धाम धवळा । एक तो सहज मेघ सां-वळा । एक कंठीं रुंडमाळा । एक गळां वैजयंती

ek gokshir dham dhavala | ek to sahaj megh san-vala | ek kanthin rundamala | ek galan vaijayanti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक गोक्षीर धाम धवळा । एक तो सहज मेघ सां-वळा । एक कंठीं रुंडमाळा । एक गळां वैजयंती ॥१॥ एक तो वृषारुढ जाण । एका साजे गरुडवाहन । एक स्मशानीं भस्मोद्धु-ळण । एका शयन क्षीरसागरीं ॥२॥ एक तो भोळा कैलासीं चक्रवतीं । एक तो वैकुंठाधिपती । एका सुरवर मुगूटीं वंदीती । एका अंगुष्ठी गंगा वाहे ॥३॥ एकाचे चरणीं नेपुरें झणत्कारु । एका पायीं रुळे तोडरु । एका परिधान व्याघ्रांबरु । एका पीतांबरु कसियला ॥४॥ एका नरकपाला खट्वांग डमरु त्रिशूल । एका शंख चक्र गदा कमळ । एका अर्धांगीं हैमवती बाळ । एका कमळा वामभागीं ॥५॥ एक त्रिपुर संधानीं लक्ष न चुके । एकबाणें वाळि वधिला कैतुकें । विष्णुदास नामा एक रूप देखे । हरि-हर कौतुकें वर्णितसे ॥६॥