भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया

dvarakechya raya | buddhi dega nam gaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥१॥ मतिमंद तुझी दासी । ठाव देईं चरणांपासीं ॥२॥ तुझे पदरीं पडलें खरी । आतां सांभाळ करीं हरी ॥३॥ न कळे हरीची करणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥