भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुसरी जे होती गर्भिण कुरंगी । तेही लागवेगीं आली तेथें

dusari je hoti garbhin kurangi | tehi lagavegin ali tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुसरी जे होती गर्भिण कुरंगी । तेही लागवेगीं आली तेथें ॥१॥ आहा ऐसें काय केलें वो साजणी । नयेसी अझुनी कोंपटासी ॥२॥ लहान पाडसें आक्रंदती भुकें । कैसी येथें सुखें राहिलिसी ॥३॥ जाईं लवलाही त्यांसी स्तन देईं । सांगूं आतां कांहीं बोलवेना ॥४॥ नामा ह्मणे धन्य तयाचें सौजन्य । नाही भावभिन्न कोणामाजी ॥५॥