भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाची बुद्धि वोखटी दारुण । आपण मरून दुजा मारी

durjanachi buddhi vokhati darun | apan marun duja mari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुर्जनाची बुद्धि वोखटी दारुण । आपण मरून दुजा मारी ॥१॥ माशी जातां पोटीं मेली तेचि क्षणीं । प्राण्या वोकवूनि कष्टी करी ॥२॥ दीपकाची ज्योति पतंग नासला । अंधार पडिला जनामध्यें ॥३॥ तैसा नैसर्गिक स्वभाव दुष्टांचा । शेखीं ज्याचा त्यासी फळां येतो ॥४॥ झाली सज्जनाची संगति कदापि । जाईना तथापि त्याची क्रिया ॥५॥ सहज मळलें धुतां शुद्ध होय । बिब-याचा काय डाग जातो ॥६॥ वज्रहि फुटेल नभहि तुटेल । भला तो होईल ऐसा जाणा ॥७॥ नामा म्हणे कुंभपाकींचा तो धनी । त-यासी भल्यांनीं बोलूं नये ॥८॥