भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार

durghat ten duhkh lagon nedi bhakta | tyachi tuj chinta ase phar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥ आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥ जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा । मुक्त केलें महिषा मार्गीं जाण ॥३॥ जाणती प्रेमळ कीर्तानासी नर । समाधि निरंतर म्हणे नामा ॥४॥