भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरीं पाउलें घाले:-नियां

dondil dondil tamakat chale | gojirin paulen ghale:-niyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरीं पाउलें घाले:-नियां ॥१॥ पायीं रुणझुण रुणझुणिती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥ सांवळें सगुण मानसमोहन । गोपीमनरंजन ह्मणे नामा ॥३॥