भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर । त्यांत जलचर स्वस्थ होतों

dnyanadev majhen saukhyasarovar | tyant jalachar svastha hoton

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर । त्यांत जलचर स्वस्थ होतों ॥१॥ दुर्दैव तापानें आटलें तें नीर । वर्षी रघुवीर कृपामेघ ॥२॥ ज्ञानदेवाविण व्याकुळ हे प्राण । तूं जगज्जीवन देव होसी ॥३॥ विठाबाई तूं गे जाणसी ना जाण । रक्षी मज कोण दुजे येथें ॥४॥