भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिशा फेरफेरे कष्टशील सैरा । किती येरझारा कल्प-कोटी

disha pheraphere kashtashil saira | kiti yerajhara kalpa-koti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दिशा फेरफेरे कष्टशील सैरा । किती येरझारा कल्प-कोटी ॥१॥ विठ्ठलाचे नामीं दृढ धरीं पाव । येर सांडीं वाव मृग-जळा ॥२॥ भक्ति भक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिती निरंतर वोळगण ॥३॥ नामा म्हणे जना मानी पैं विश्वास । मग तुज गर्भ-वास नव्हे नव्हे ॥४॥