भजनी मालिका
← भजनांकडे परत

धेनु विये वनीं तीसि कैचि सुयणी । तरीं ते वत्स स्तनीं लावी कवण

dhenu viye vanin tisi kaichi suyani | tarin te vatsa stanin lavi kavan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धेनु विये वनीं तीसि कैचि सुयणी । तरीं ते वत्स स्तनीं लावी कवण ॥१॥ भुजंगाचीं पिलीं उपजतांचि वेगळीं । त्यांसी डेखूं शिकविलें हो कोणी ॥२॥ सहज लक्ष्ण जयाचिये ठायीं । तो आपुलिये सोई धांवतसे ॥३॥ उपजतांचि फूल मोगर्‍यांच्या माथां । त्यासी परिमळता कोणे लावियेली ॥४॥ कडू दुध्याच्या आळयासी साखर दूध घातलें । ते अधिकचि कडुवाळें कवणें केलें ॥५॥ गाळिला तोडिला खंड विखंडी । ऊंन न संडी सोय गोडीसी ॥६॥ नामा म्हणे तैसें आहे गा श्रीहरी । साईचे व्यपारीं घेईन तूतें ॥७॥