भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ते संसारीं पवित्र ते वाणी । अखंड उच्चारणी रामनाम

dhanya te sansarin pavitra te vani | akhand uchcharani ramanam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य ते संसारीं पवित्र ते वाणी । अखंड उच्चारणी रामनाम ॥१॥ तयांचीच एक सरली येरझार । उतरले पार भव-नदी ॥२॥ वधोनी ताटीका सुबाहुही देख । सिद्धि नेला मख कौ-शिकाचा ॥३॥ पहावया यावे स्वयंवर सीतेचें । आलें जनकाचें पत्र तेथें ॥४॥ मारगीं चालतां ब्रम्हीयाची बाळा । उद्धरली शिळा पदरजें ॥५॥ मोडील धनुष्य तया हें देईन । केला होता पण ज-नकानें ॥६॥ रावणादि राजे आले थोर थोर । त्यांचा उत-रला नूर पाहतांची ॥७॥ अहर्निशीं जया ध्यानीं ध्याय भोळा । तो उठला सांवला बाप माझा ॥८॥ सुरां असुरां असाध्य ऐसें तें प्र-चड । तें तीं ठायां कोदंड मोडियलें ॥९॥ पाहोनी ऐसें नामा म्हणे बळ । सीता घाली माळ रघुवीरा ॥१०॥