भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य पुण्यभूमि आळंदी हें गांव । दैवताचें नांव सिद्धेश्वर

dhanya punyabhumi alandi hen ganv | daivatachen nanv siddheshvar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य पुण्यभूमि आळंदी हें गांव । दैवताचें नांव सिद्धेश्वर ॥१॥ चौर्‍यांशीं सिद्धींचा सिद्धभेटी मेळा । तो सुखसोहळा काय सांगूं ॥२॥ विमानांची दाटी पाहती सुरवर । वर्षताती भार सुमनांचे ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांति घ्यावया कल्पवरी ॥४॥