भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य गोकुळ महीतळीं मंडळ । सुखावलें ब्रह्म जेथें झालें सगुण

dhanya gokul mahitalin mandal | sukhavalen brahma jethen jhalen sagun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य गोकुळ महीतळीं मंडळ । सुखावलें ब्रह्म जेथें झालें सगुण ॥१॥ काय न कळे आवडी त्याचा भाव । सुख नेलें रे गोवळीं ह्मणती देव ॥२॥ आलें वैकुंठभुवनीं विकृति । ते हे पाहवी गौळियांची विश्रांति ॥३॥ योगियांचे ध्यानीं उगवलें । तया गौळि-यांचे अनुरागीं रंगलें ॥४॥ वेद श्रुतीसी पारू न कळे । कोण सुख सर्वांहूनि आगळें ॥५॥ नामया स्वामी आमुचें कुलदैवत । शरण जाऊनि गौळिया मागूं उच्चिष्ट ॥६॥