भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें

dhanya dhanya jyache charanin gangaogh jhala | mastakin dharila umakanten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥ धुंडितां ते पाय शिणला तो ब्रम्हा । बोल ठेवी कर्मा आपुलिल्या ॥२॥ शुक सनकादिक फिरती हरिजन । नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥ ते चरण आम्हांसी ग्रवसले अनायासी । धन्य झाली दासी जनी म्हणे ॥४॥