भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य आळंकापुरी शिवपीठ शिवाचें । अगस्ति ऋषीचेम पूर्वस्थळ

dhanya alankapuri shivapith shivachen | agasti rushichem purvasthal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य आळंकापुरी शिवपीठ शिवाचें । अगस्ति ऋषीचेम पूर्वस्थळ ॥१॥ त्रिवर्गीं म्हणितलें जाताम जातां हरी । आम्हां कौंडण्यपुरीं आज्ञा द्यावी ॥२॥ इंदनीळ पर्वत नेमिला सोपान देवा । तोंवरी करुं सेवा अंबिकेची ॥३॥ देव म्हणे भलें आरंभिलें तुम्ही । आज्ञा घेतों आम्हीं पंढरीसी ॥४॥ इंद्रनीळ पर्वती समाधि सोपान । सर्वत्र आमंत्रण देवेम दिलें ॥५॥ देवभक्तालागीं जालें समाधान । मग सुरगण आंवतिले ॥६॥ नामा पुंडलिक निघाले बाहेरी । गरुडावरी देव स्वार जाले ॥७॥