भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवुनि जाईन श्रीमुख पाहीन । इडापिडा घेईन विठोबाची

dhanvuni jain shrimukh pahin | idapida ghein vithobachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धांवुनि जाईन श्रीमुख पाहीन । इडापिडा घेईन विठोबाची ॥१॥ तया सुखा दृष्टि लागेल वो झणीं । मग मी साजणी काय करूं ॥२॥ म्हणोनि माझें चित्त व्यापिलें उद्वेगें । सिणलें मी उबगें जन्मोजन्मीं ॥३॥ धरोनियां घालीं जीवाचे अंतरीं । आंतोनि बाहेरी जाऊं नेदीं ॥४॥ वासना पापिणी करील पायरव । मग हा अनुभव कोठें पाहूं ॥५॥ वृत्तिसहित करीन मनाचें सांडणें । न विसंबें प्राणें म्हणे नामा ॥६॥