भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवत धांवत जाईन वोरसे । दाटला उल्हासें कंठ माझा

dhanvat dhanvat jain vorase | datala ulhasen kanth majha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धांवत धांवत जाईन वोरसे । दाटला उल्हासें कंठ माझा ॥१॥ अंतरींचें गुज सांगेन आपुलें । ह्लदयीं दाटले प्रेमअश्रु ॥२॥ पीतांबर छाया करूनि भक्तांसी । सांगेन मी खती तयापुढें ॥३॥ संतसमागमें दावीं कवतुकें । पाठवी भातुकें देऊनियां ॥४॥ नामा म्हणे मज आहे भरंवसा । मना तूं विश्वास दृढ धरीं ॥५॥