भजनी मालिका
← भजनांकडे परत

धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या

dhanivari dhyan karin kanre mana | ya sukh nidhana vithobachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या ॥१॥ पंढरीये-तैसें सुख आहे त्याचे पायीं । अनुसरोनि राहीं एकवेळ ॥२॥ श्रीमुख साजिरें पाहीं दृष्टिभरी । जीवित्वाचें करीं निंबलोण ॥३॥ जेणें लक्ष धरोनि आहे पुंडलीक । तोचि भाव एक दृढ धरीं ॥४॥ नलगे गुरुमंत्र नलगे जप तप । उघडें स्वरूप विटेवरी ॥५॥ नामा ह्मणे जरी निकत संतचरन । तरीच प्रेमखून पावसील ॥६॥