भजनी मालिका
← भजनांकडे परत

धनमानबळें नाठविसी देवा । मृत्युकाळीं तेव्हां कोण आहे

dhanamanabalen nathavisi deva | mrutyukalin tevhan kon ahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धनमानबळें नाठविसी देवा । मृत्युकाळीं तेव्हां कोण आहे ॥१॥ यमाचे यमदंड बैसतील माथां । तेव्हां तुज रक्षिता कोण आहे ॥२॥ मायबापबंधु तोंवरी सोयरीं । इंद्रियें जोंवरी वाह-ताती ॥३॥ सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता । तेहि केश देतां रडतसे ॥४॥ विष्णुदास नामा जातांचि शरण । स्वप्नीं जन्म-मरण नाहीं नाहीं ॥५॥