भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया

devin devesh shivin shivesh | agamya suras adimaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥१॥ अष्टदिशा अगोचरें अष्टभुजा संहारकरें । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥ वदताती देव आणि सुरगण । उतरिलीं विमानें ठायीं ठायीं ॥३॥ सकळांनी पूजा केली आनंदानें । करिती कीर्तनें अंबेपुढें ॥४॥ मंडपीं बैसले निवृत्ति नारायण । नारदकीर्तनें पुढें होत ॥५॥ नामा म्हणे देवी पहाती सकळ । पूजिती गोपाळ आनंदानें ॥६॥