भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचें हें गुज सकळ मंत्रमय । जें कां नित्य ध्येय शंकराचें

devachen hen guj sakal mantramay | jen kan nitya dhyey shankarachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवाचें हें गुज सकळ मंत्रमय । जें कां नित्य ध्येय शंकराचें ॥१॥ तें हें रामनाम सेवितां सर्वभावेम । रामरुप व्हावें निश्चयेंसी ॥२॥ नष्ट अजामेळाचें पतितत्व गेलें । दिव्य देह जालें वालिमिकाचें ॥३॥ शरीरसंपत्ति बळीनें देऊनि सकळ । केला द्वारपाळ नारायण ॥४॥ कृष्णाविण दुजें नेणती कायावाचा । जाला पांडवांचा साहाकारी ॥५॥ नामा म्हणे केशव भावाचा लंपट । भक्ताशीं निकट रतलासे ॥६॥