भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचे हे आत्मे जाणावे संत । त्यांचे पदीं रत सर्वभावें

devache he atme janave sant | tyanche padin rat sarvabhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवाचे हे आत्मे जाणावे संत । त्यांचे पदीं रत सर्वभावें ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजचि होय । श्रम लया जाय जाला आधीं ॥२॥ पापाचे पर्वत भस्म नामाग्नीनें । अभक्तासी हाण नामविण ॥३॥ नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटीं । नाना पाप कोटी दग्ध होती ॥४॥