भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे

devache anchalin uthila gajar | viththalanamen ambar garjatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे ॥१॥ संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥ वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार । नामाचा गजर महाद्वारीं ॥३॥ ऐसी आनंदानें नामाच्या गजरीं । दिली महाद्वारीं समाधि त्या ॥४॥ अस्थि निक्षेपण आपुलीया हातें । करूनि अनंतें पाषाण ठेवी ॥५॥ राही रखुमाई कुर्वंडी करिती । सत्यभामा आरति ओंवाळीत ॥६॥ नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा । जाईन माझ्या बापा ओंवाळून ॥७॥