भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावें सासवडा उत्सवासी

dev mhane namya margashirsha gadha | javen sasavada utsavasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावें सासवडा उत्सवासी ॥१॥ सोपानासी आम्हीं दिधलें वचन । चला अवघेजण समुदाय ॥२॥ आळंकापुरीची यात्रा केली सांग । मग पांडूरंग सिद्ध जाले ॥३॥ दुरोनि पताका दिसती मनोहर । उठावले भार वैष्णवांचे ॥४॥ निवृत्ति मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कर्‍हेतीरीं ॥५॥ नामा म्हणे देव गंधर्व सुरगण । चालिले सोपान समाधीसी ॥६॥