भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव जाला नामा नामा जाला देव । गोणाईचा भाव पाहावया

dev jala nama nama jala dev | gonaicha bhav pahavaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव जाला नामा नामा जाला देव । गोणाईचा भाव पाहावया ॥१॥ हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥ हातीं धरोनियां घेऊनी चालिली । फिरूनी पाहती जाली तंव तो देव ॥३॥ अगा माझ्या बापा तूं कोणा हवासी हवासी । मज दुर्बळासी काय होय ॥४॥ सोळा सहस्त्र मुख्य अष्ट तुझ्या कांताआ । त्या माझिया घाता प्रवर्ततील ॥५॥ पुंडलिकासी तुवां दिधली आहे भाक । गोणाई म्हणे ठक बहु होसी ॥६॥