भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें

dev guj sange pandharisi yare | premen chittin ghyare nam majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें ॥१॥ काया वाचा मन दृढ धरा जीवीं । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥ भवसिंधु तारीन घ्यारे माझी भाक । साक्ष पुंड-लिक करूनि बोले ॥३॥ लटकें जरी असे नामयासी पुसा । आहे त्या भरंवसा नामीं माझ्या ॥४॥