भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ

dev bhavacha lampat | soduni ala ho vaikunth

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥ हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥ उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा ॥४॥ सर्व सुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ॥५॥