भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखिला सांवळा राजा द्वारकेचा । सर्वही सुखाचा ठेवा दिसे

dekhila sanvala raja dvarakecha | sarvahi sukhacha theva dise

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देखिला सांवळा राजा द्वारकेचा । सर्वही सुखाचा ठेवा दिसे ॥१॥ माथां तो मुगुट कुंडलें श्रवणीं । प्रभा दिनमणी तुच्छ जेथें ॥२॥ कोटी मन्मथांची झाडणी करावी । ऐसी ते बरवी अंगकांती ॥३॥ श्रीमुख शोभलें पूर्णचंद्रा ऐसें । देखतांचि दोष सर्व जाती ॥४॥ केशराची उटी कस्तुरी मळवटी । माळ रुळे कंठीं वैजयंती ॥५॥ श्रीवच्छलांछन मुद्रिका भूषण । झळकती आन भुजादंड ॥६॥ नामा म्हणे ऐसा देखियेला देव । तयाचा अनुभव काय वानूं ॥७॥