भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहुडा चरण वाहातुसे वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा

dehuda charan vahatuse venu | gopikaramanu svami majha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देहुडा चरण वाहातुसे वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा ॥१॥ देखिलागे माय यमुनेचे तीरीं । हात खांद्यावरी राधि-केच्या ॥२॥ गुंजावर्ण डोळे शिरीं बाबर झोटी । मयूर पिच्च वेष्टी शोभतसे ॥३॥ सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशवराज ॥४॥