भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह जावो हेंचि घडी । पाय हरिचे न सोडी

deh javo henchi ghadi | pay hariche na sodi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देह जावो हेंचि घडी । पाय हरिचे न सोडी ॥१॥ क्लेश होत नानापरी । वाचे रामकृष्ण हरी ॥२॥ नाचूं वैष्णवांचे मेळीं । हांक विठ्ठल आरोळी ॥३॥ नामा म्हणे विठोबासी । जें तें घडो या देहासी ॥४॥