भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं

deh ahe tanv karare dhanvani | sharan chakrapani righa vegin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं ॥१॥ येर ते लटिके इष्टमित्र सखें । हे तंव पारीखे सर्व चोर ॥२॥ लावूनि मोहातें दास्यत्व करविती । अंतकाळीं होती पाठि-मोरे ॥३॥ मायेचे भूलीनें भुललीं सकळें । हें तुज न कळे कटकट ॥४॥ यापरी आयुष्य वेंचेलरे जना । पुढें यमयातना न चुकती ॥५॥ धोतरा देऊनि चोर सर्व हरीती । नामा ह्मणे गति तेचि झाली ॥६॥