भजनी मालिका
← भजनांकडे परत

दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष

dasharathen marila tochi hota mas | varsharutu ase krushnapaksha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥ वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परी-क्षिती ॥२॥ रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र । माया घाली अस्त्र रक्ष-पाळां ॥३॥ नवग्रह अनुकूळ सर्वांचें जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥ जयाचा हा वंश तयासी आनंद । माझे कुळीं गोविंद अवतरला ॥५॥ अयोनीसंभव नोहे कांहीं श्रमीं । नामयाचा स्वामी प्रगटला ॥६॥