भजनी मालिका
← भजनांकडे परत

दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे

dashamiche divashi keli pradakshina | anik kirtana sant ubhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे ॥१॥ रात्रंदिवस त्यांही केला हरिजागर । हरिदिनीं थोर कृष्णपक्षीं ॥२॥ मग केलें स्नान भागिरथीचे तीरीं । संत महंता भारी पूजिजेलें ॥३॥ अवलोकिलें डोळां अंतर बाहेरी । मग सिद्धेश्वरी येत झाले ॥४॥ सिद्धेश्वरालगीं पूजिले निवळ । मागितलें स्थळ समाधीसी ॥५॥ गंगा आणि गिरजा नीलकंठ ईश्वर । केला नमस्कार नामा म्हणे ॥६॥