भजनी मालिका
← भजनांकडे परत

दास जाल्यावरी करिसी उदास । मनीं तें तुम्हांस आणी देवा

das jalyavari karisi udas | manin ten tumhans ani deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दास जाल्यावरी करिसी उदास । मनीं तें तुम्हांस आणी देवा ॥१॥ सोशिले प्रवास जन्मजन्मांतर । करिसी अव्हेर आम्हांलागीं ॥२॥ भार खांद्यावरी घेऊनी हिंडवी । होसी मजविशि पाठमोरा ॥३॥ श्रांत सावकाश गाती इतिहास । काय कासाविस होय तुम्हां ॥४॥ नामा म्हणे नको वाउगे उदीम । न सोडीं मी नाम केल्या कांहीं ॥५॥