भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला

chokhamela sant bhala | tenen dev bhulavila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला ॥१॥ भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटीं ॥२॥ चोख्यामेळ्याची करणी । तेणें देव केला ऋणी ॥३॥ लागा विठ्ठल चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥