भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतातुर देहीं न साहे काजळी । नामाची पाजळी उभय दिवीं

chintatur dehin na sahe kajali | namachi pajali ubhay divin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चिंतातुर देहीं न साहे काजळी । नामाची पाजळी उभय दिवीं ॥१॥ प्रकाश पडेल ब्रह्म हें दिसेल । वैकुंठ जोखेल भजनभक्तीं ॥२॥ नाहीं यातीवर्ण नाहीं हें वेदोक्त । नार्मेचि संतृप्ति होती जीवा ॥३॥ नामा म्हणे हेंचि बीजसार । तुटेल येरझार भवबंधाची ॥४॥