भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिदानंदघन चिन्मय बाळकृष्ण । खेळवितां मन होय उन्मन

chidanandaghan chinmay balakrushna | khelavitan man hoy unman

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चिदानंदघन चिन्मय बाळकृष्ण । खेळवितां मन होय उन्मन ॥१॥ सुख अनुभवी अनुवाद खुंटला । विश्वंभरीं तोचि अनुवाद गोठला ॥२॥ दुजें न दिसे उपमेसी द्यावया । मन न मिळे आन सुख घ्यावया ॥३॥ ज्ञाता हेंचि अद्वय । ध्याता ध्यान ध्येय हेंचि निरामय ॥४॥ जन्मोजन्मींचें पुण्य संचित । झालें गौळियांचें काय मुर्तिंमंत ॥५॥ नामया स्वामीची अनुपम्य आवडी चित्तें दिधली प्रेमरसी ॥६॥