भजनी मालिका
← भजनांकडे परत

छत्र चामरें उभा सन्मुख भोंवती । रुक्माईचा पति मध्यभागीं

chhatra chamaren ubha sanmukh bhonvati | rukmaicha pati madhyabhagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
छत्र चामरें उभा सन्मुख भोंवती । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥१॥ निंबें आणि नारळ गोण्याची पोफळें । उदंड तिहीं केळें आणियलीं ॥२॥ आणिक बहुता परी घेतली सामुग्री । पीत पीतांबरी मृगछाला ॥३॥ भगवीं आभरणें घेतलें भस्म । अंगें परब्रह्य साह्य त्यासी ॥४॥ नामा म्हणे स्वामी तिष्ठताती अंगें । मेळविली सांगें साहित्यासी ॥५॥